Question
Download Solution PDFवाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला साहाय्य देण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वत:च संबंधित गाडीचा मालक आहे. आणि स्वत:च्या जुळया मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकर्या करतो. व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वत:च्या दाव्यांसंबंधातील सर्व दस्तावेजही त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बर्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम तोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गयावया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर पर्याय 4 आहे.
परिस्थितीचा सारांश: येथे, वर दिलेली परिस्थिती ही वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थाला सहायता करण्याबाबत आहे, जो त्याच्या वरिष्ठांना पुढील परिस्थितीत उपाय सुचविण्याची विनंती करत आहे, त्या प्रशिक्षणार्थाने आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे अशा एका व्यक्तीस दंड म्हणून बरीच मोठी रक्कम भरायला सांगितली आहे जो रात्रीच्यावेळी दिव्याशिवाय कार वापरत होता, परंतु कार मालकाने अधिकाऱ्याला त्याच्या कौटुंबिक समस्येचे खरे कारण सांगितले आणि आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी तो दोन पाळीमध्ये कार चालवतो हे ही सांगितले, आता अशा परिस्थितीत प्रशिक्षणार्थीने तुम्हाला यावर उपाय सुचवण्याची विनंती केली आहे....
Additional Information
उत्तर | विधान | निष्कर्ष | गुण |
सर्वोचित | दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या. | आपल्या जुळ्या मुलींना शिक्षण देण्यासाठी दोन पाळीमध्ये कार चालवताना कार चालक प्रामाणिक असल्याचे दिसते, त्याने सर्व दस्तावेजही संबंधित अधिकाऱ्याला सादर केले आहे तसेच आपल्याला परिस्थितीची माहिती नसल्याचे आणि यापुढे काळजी घेईन असे सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्याने त्याच्याकडून मोठी दंडाची रक्कम घेऊन त्याचे जगणे कठीण करू नये आणि त्याला कडक ताकीद देऊन सोडून द्यावे. | 2.5 |
उचित | व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्याल. | दुसरा पर्याय निवडणे देखील योग्य असेल कारण, या प्रकरणात अधिकाऱ्याने त्याच्याकडून रक्कम दंड म्हणून घ्यावी आणि त्याची पहिलीच वेळ असल्याने त्याला जाऊ द्यावे. | 1.5 |
कमी विचारणीय | त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक होईल. | इतर पर्यायांच्या तुलनेत हा पर्याय निवडणे कमी विचारणीय असेल कारण त्याला कोठडीत ठेवल्याने त्याला पुन्हा चूक न करण्याची आणि सर्व नियमांचे पालन करण्याची जाणीव होईल. | 1 |
अनुचित | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे कारण सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे. | हे अनुचित आहे कारण, सर्व लोक जाणूनबुजून नियम मोडत नाहीत, हे काहीवेळा नकळत घडू शकते, त्यामुळे असे प्रकरण आढळल्यास, एखाद्याने इतर लोकांवर कठोरपणे वागू नये आणि जबरदस्तीने दंड ठोठावणे योग्य नाही. . | 0 |
Last updated on Jun 12, 2025
-> MPSC Mains Final Answer Key 2025 for State Service is released on the official website.
-> MPSC Mains Admit Card 2025 for State Service is released. Exam on 29 May
-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025.
-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule.
-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies.
-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025.
-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.
-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.
-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.
-> Stay updated with daily current affairs for UPSC.