Question
Download Solution PDF'ती पहा समोर बस आली' या वाक्याचा काळ ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFकाळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात.
काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात.
- वर्तमानकाळ
- भूतकाळ
- भविष्यकाळ
वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात.
- साधा
- अपूर्ण
- पूर्ण
- रीती
भूतकाळ - साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते.
भूतकाळाचे देखील सर्वसाधारण पणे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.
- साधा भूतकाळ
- अपूर्ण / चालू भूतकाळ
- पूर्ण भूतकाळ
- रिती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
Important Pointsभूतकाळाच्या प्रकाराच्या काही विसंगती(अपवाद) पुढीलप्रमाणे-
कधी कधी एखाद्या वाक्यात चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच भूतकाळात बोलली जाते.
उदा. ते पहा तुझे मामा आले.
वरील वाक्यात मामा येण्याची क्रिया चालूच असुन देखील वाक्य भूतकाळात बोलून क्रिया पूर्ण झाली असे दाखविल्या गेले आहे.
अशाच प्रकारे ती पहा समोर बस आली या वाक्यात बस येण्याची क्रिया चालूच असून देखील वाक्य भूतकाळात बोलून क्रिया पूर्ण झाली आहे.
म्हणून 'ती पहा समोर बस आली' या वाक्याचा काळ भूतकाळ असाच येईल.
Last updated on Jun 14, 2024
-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.
->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.
-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.
-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.