समानार्थी शब्द MCQ Quiz in தமிழ் - Objective Question with Answer for समानार्थी शब्द - இலவச PDF ஐப் பதிவிறக்கவும்

Last updated on Apr 22, 2025

பெறு समानार्थी शब्द பதில்கள் மற்றும் விரிவான தீர்வுகளுடன் கூடிய பல தேர்வு கேள்விகள் (MCQ வினாடிவினா). இவற்றை இலவசமாகப் பதிவிறக்கவும் समानार्थी शब्द MCQ வினாடி வினா Pdf மற்றும் வங்கி, SSC, ரயில்வே, UPSC, மாநில PSC போன்ற உங்களின் வரவிருக்கும் தேர்வுகளுக்குத் தயாராகுங்கள்.

Latest समानार्थी शब्द MCQ Objective Questions

Top समानार्थी शब्द MCQ Objective Questions

समानार्थी शब्द Question 1:

पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे?

  1. रवी
  2. आदित्य
  3. भानू
  4. सुधाकर

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : सुधाकर

समानार्थी शब्द Question 1 Detailed Solution

उत्तर- सुधाकर 
'रवी', 'आदित्य''भानू' हे शब्द 'सूर्य' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 'सुधाकर' हा शब्द 'चंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणून तो गटाबाहेरील शब्द ठरतो. 
Key Points
समानार्थी शब्द:
  • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. 
  • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. 
  • उदा. सूर्यप्रभाकर, दिनमणी, रवी, मार्तंड, अर्क, दिवाकर, अंशुमाली, चंडांशु, हिरण्यगर्भ, आदित्य, भानू, सविता, मित्र, भास्कर, दिनकर; चंद्रइंदु, चंद्रमा, चांद, कलनिधी, कलाधर,चांदोबा, निशानाथ, राकेश, विध, शशी, सुधांशु, शशांक, सोम, निशिकांत, रजनीकांत, कुमुदनाथ, सुधाकर, विभाकर. 

समानार्थी शब्द Question 2:

गटाबाहेरील शब्द कोणता?

  1. सोम
  2. शशी
  3. इंदु 
  4. अर्णव

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अर्णव

समानार्थी शब्द Question 2 Detailed Solution

उत्तर- अर्णव
वर दिलेल्या पर्यायांतील 'सोम','शशी''इंदु' हे शब्द 'चंद्र' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 'अर्णव' हा 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणून तो गटाबाहेरील शब्द ठरतो.   
Key Points
समानार्थी शब्द:
  • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. 
  • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. 
  • उदा. चंद्र= इंदु, चंद्रमा, चांद, कलनिधी, कलाधर,चांदोबा, निशानाथ, राकेश, विध, शशी, सुधांशु, शशांक, सोम, निशिकांत, रजनीकांत, कुमुदनाथ, सुधाकर, विभाकर. 

समानार्थी शब्द Question 3:

"निर्जर" या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा. 

  1. जल
  2. जर 
  3. मुख 
  4. ईश्वर

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ईश्वर

समानार्थी शब्द Question 3 Detailed Solution

उत्तर - निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द ईश्वर हा होईल.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

Additional Informationपाणी या शब्दाचा समानार्थी शब्द जल हा होईल.

जर म्हणजे ताप येणे होय.

तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द मुख हा होईल.

समानार्थी शब्द Question 4:

पुढील शब्दांपैकी 'रान' या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा?

  1. वल्लरी
  2. वन
  3. विपिन
  4. कानन

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : वल्लरी

समानार्थी शब्द Question 4 Detailed Solution

उत्तर - वल्लरी हा रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द आहे.

वेल, लता, लतिका हे वल्लरी या शब्दाचे समानार्थी शब्द होतील.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. 

समानार्थी शब्द Question 5:

समान अर्थाचा शब्द ओळखा. 'विमोचन'

  1. मुक्ती
  2. आकुंचन
  3. प्रसारण
  4. संश्लेषण

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : मुक्ती

समानार्थी शब्द Question 5 Detailed Solution

उत्तर- मुक्ती 
'विमोचन' या शब्दाचा समानार्थी शब्द 'मुक्ती' हा आहे. 
Key Points
समानार्थी शब्द:
  • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. 
  • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. 
  • उदा. विमोचन= मुक्ती, मुक्तता, सुटका. 

समानार्थी शब्द Question 6:

'कृशान' शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा.

  1. वायू
  2. आग
  3. जल
  4. पर्वत

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : आग

समानार्थी शब्द Question 6 Detailed Solution

समानार्थी शब्द-

  • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
  • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
  • सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते. 

 

'कृशान' शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आग हा आहे. अनल, अग्नि अशीही इतर याला समानार्थी शब्द आहेत.

Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

  • वायू = समीर, वारा
  • जल = नीर, पाणी
  • पर्वत = गिरि, अद्री

समानार्थी शब्द Question 7:

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'अद्वैत'

  1. वैर
  2. ऐक्य
  3. द्वंद्व
  4. दुही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : ऐक्य

समानार्थी शब्द Question 7 Detailed Solution

उत्तर- ऐक्य 
'अद्वैत' या शब्दाचा समानार्थी शब्द 'ऐक्य' हा आहे. 
Key Points
समानार्थी शब्द:
  • ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. 
  • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. 
  • उदा. अद्वैत= ऐक्य, मतैक्य, एकोपा. 

समानार्थी शब्द Question 8:

खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा

  1. आखूड - कोता
  2. खंदा - दगड
  3. फिर्याद - तक्रार
  4. खिन्न - उदास

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : खंदा - दगड

समानार्थी शब्द Question 8 Detailed Solution

उत्तर - खंदा - दगड ही समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे.

खंदा या शब्दाचे मत्सर, द्वेष, अतिशय पाणीदार किंवा साहसी असे अर्थ होतात.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. 

समानार्थी शब्द Question 9:

प्रस्तुत पर्यायांपैकी 'मन' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

  1. मानस
  2. हृदय
  3. अंत:करण
  4. चित्त

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : हृदय

समानार्थी शब्द Question 9 Detailed Solution

समानार्थी शब्द-

एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 

प्रस्तुत पर्यायांपैकी 'मन' या शब्दाचे समानार्थी शब्द अंत:करण, चित्त, मानस हे आहेत.

दिलेल्या पर्यायांपैकी  'मन' या शब्दाचा समानार्थी शब्द हृदय हे नाही.

समानार्थी शब्द Question 10:

‘कारस्थानी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  1. मसलत्या
  2. निष्कपटी
  3. भाबडा
  4. कामगार

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : मसलत्या

समानार्थी शब्द Question 10 Detailed Solution

उत्तर - कारस्थानी या शब्दाचा समानार्थी शब्द मसलत्या हा होईल.

मसलत्या या शब्दाचा अर्थ लुच्चा किंवा अतिशहाणा किंवा धूर्त असा होतो.

Additional Informationसमानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

भाबडा म्हणजे साधा किंवा भोळा होय.

निष्कपटी म्हणजे निष्पाप किंवा साधा होय.

कामगार म्हणजे काम किंवा मजुरी करून वेतन मिळवणारी व्यक्ती होय.

Get Free Access Now
Hot Links: teen patti real cash withdrawal teen patti gold new version 2024 teen patti real teen patti master apk