Question
Download Solution PDFकोठारी आयोगाने राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही टक्के शिक्षणामध्ये गुंतविण्याची शिफारस केली होती. ती टक्केवारी किती होती?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFकोठारी आयोग (1964-66) याला भारतीय / राष्ट्रीय शिक्षण आयोग म्हणूनही ओळखले जाते.
1964 मध्ये, कोठारी आयोगाने GDP च्या 6 % शिक्षणामध्ये गुंतविण्याची शिफारस केली होती, ही धोरणात्मक शिफारस दोन दशकांनंतर 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मान्य केली.
भारतीय / राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना :
- 'दौलत सिंग कोठारी' यांच्या अध्यक्षतेखाली.
- भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व बाबींचे(पैलू) परीक्षण करण्यासाठी.
- शिक्षणाच्या उन्नतीसाठी योग्य रणनीती आणि मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी.
- कोठारी आयोगाने भाषेसंदर्भात शिफारस केलेले धोरण हे तीन-भाषेचे सूत्र आहे.
1968 च्या धोरणात नमूद केल्याप्रमाणे तीन-भाषेचे सूत्र पुढीलप्र्माणे आहेः
- पहिली भाषा: ही मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असणे आवश्यक आहे.
- दुसरी भाषा: हिंदी भाषिक राज्यांमध्ये, दुसरी भाषा इंग्रजी किंवा इतर काही आधुनिक भारतीय भाषा असतील. हिंदी भाषिक नसलेल्या भागांमध्ये, दुसरी भाषा हिंदी किंवा इंग्रजी असेल.
- तिसरी भाषा: तिसरी भाषा शाळेत नंतरच्या टप्प्यात शिकविली जाते आणि ती देखील थोड्या काळासाठी, कारण ती केवळ मर्यादित संदर्भातच आवश्यक आहे म्हणजेच अशा सामाजिक परिस्थितीत जिथे पहिली किंवा दुसरी कोणतीही भाषा मुलास संप्रेषण करण्यास मदत करू शकत नाही.
म्हणून, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की कोठारी आयोगाने भाषेसंदर्भात शिफारस केलेले धोरण तीन भाषेचे सूत्र आहे.
कोठारी आयोगाच्या इतर प्रमुख शिफारसी (1964-66)
- सर्व मुलांसाठी शैक्षणिक संधींत समानता सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक शाळा प्रणाली .
- 10 + 2 + 3 शिक्षणाची रचना . (सामान्य शिक्षणाचे 10 वर्षे + उच्च शिक्षणाचे 2 वर्षांचे + 3 वर्षे डिग्री)
- जवळची शाळा (प्रत्येक शाळेत त्यांची जात, धर्म आणि समुदायाची पर्वा न करता प्रत्येक मुलास प्रवेश देण्यात आला पाहिजे )
Last updated on Jun 12, 2025
-> The UGC NET June 2025 exam will be conducted from 25th to 29th June 2025.
-> The UGC-NET exam takes place for 85 subjects, to determine the eligibility for 'Junior Research Fellowship’ and ‘Assistant Professor’ posts, as well as for PhD. admissions.
-> The exam is conducted bi-annually - in June and December cycles.
-> The exam comprises two papers - Paper I and Paper II. Paper I consists of 50 questions and Paper II consists of 100 questions.
-> The candidates who are preparing for the exam can check the UGC NET Previous Year Papers and UGC NET Test Series to boost their preparations.